1 - खोकला दूर करण्यासाठी एक कप पाण्यात एक आल्याचा तुकडा, चिमूटभर दालचिनी आणि 4-5 काळे मिरे टाकून ते उकळून घ्यावं. ते कोमट झाल्यानंतर गाळून त्यात एक चमचा मध टाकून ते पिल्यास लगेच आराम पडतो.
2 - लसणाच्या 3-4 पाकळ्या आणि अर्धा चमचा हळद एक ग्लास दुधामध्ये टाकून ते उकळा. रात्री झोपण्याआधी ते प्यावं.
3 - एक चमचा आद्रकच्या रसात मध मिसळून ते रोज सकाळी उपाशीपोटी घेतलाने लगेच आराम मिळतो.
4 - कपभर पाण्यात 4-5 लवंग टाकून ते उकळून घा. कोमट झाल्यानंतर त्यात अर्ध लिंबू पिळा. मग त्यात एक चमचा मध मिसळून ते प्या.
5 - मोहरीच्या तेलामध्ये 4-5 पाकळ्या लसून टाकून ते गरम करून घ्या. ते कोमट झाल्यानंतर पायाच्या तळव्यांवर आणि छातीवर लावून मालिश करा.
No comments:
Post a Comment