Monday 24 February 2020

घोरण्याची समस्या: घरघुती उपाय

आपल्या घरामध्ये कुणाला घोरण्याची समस्या असेल तर घोरण्याच्या आवाजामुळे कुटुंबातील इतरांना व्यवस्थित झोपही घेता येत नाही. रात्री झोप झाली नाही की दुसरा त्यांचा संपूर्ण दिवस आळसात जातो. तब्येतीवरही त्याचा परिणाम दिसायला लागतो. घोरणाऱ्या व्यक्तीलाही आपल्यामुळे इतरांना झोप घेता येत नाही याचे वाईट वाटते. पण तो ही काही करु शकत नाही. आज आम्ही आपल्याला असे काही घरघुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे घोरण्याच्या समस्येवर मात करता येईल.

घोरण्याची समस्या कशामुळे होते ?
गाढ झोप लागल्यानंतर हळूहळू टाळू, घसा आणि जिभेचे स्नायू शिथील पडतात. त्यामुळे श्वसनमार्गात अडथळा यायला लागतो. अरुंद श्वसननलिकेतुन श्वासोच्छवास करताना श्वसननलिकेच्या मार्गात येणाऱ्या उती कंपन पावतात आणि कपणाचा आवाज निर्माण होतो. त्यालाच घोरणे असे म्हणतात.
काय आहेत उपाय ?
१) झोपण्यापूर्वी ३० मिनिटे अगोदर हळद घालून दूध पिल्याने घोरण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.
२) झोपायच्या आधी पुदिना तेलाचे काही थेंब पाण्यामध्ये टाकुन गुळण्या केल्यास नाकामधील सुज कमी होऊन छिद्र मोकळे होईल आणि मोकळा श्वास घेता येईल.
 ३) कोमट पाण्यामध्ये चमचाभर हळद आणि मध टाकून प्यायल्याने घोरण्याची समस्या काही दिवसात दूर होते.
४) झोपायच्या आधी कोमट पाण्यामध्ये वेलदोड्याची पूड टाकून प्यायल्यानेही घोरण्याची समस्या दूर होते.
आहारात काय बदल करणार ?
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आहारातही काही बदल करता येतील. विशेषतः रात्रीच्या जेवणात दुग्धजन्य पदार्थ, मैदा घालून बनवलेले पदार्थ आणि गॉड पदार्थ टाळावे लागतील. चॉकलेट, मसालेयुक्त पदार्थ, तेलकट पदार्थ, मद्यपान, इत्यादि गोष्टीही बंद कराव्या लागतील.
ज्यूस पिऊनही घोरण्याची समस्या दूर करता येईल
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी गाजर, सफरचंद, लिंबू आणि आले एकत्र करून ज्यूस बनवा. दररोज हा ज्यूस पिल्यास घोरणे बंद होते.
योगा करा आणि घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवा
विशिष्ट प्रगतीची योगासने आणि प्राणायामामुळे श्वसनमार्ग मोकळा व्हायला मदत होते. भ्रामरी आणि उज्जयी प्राणायाम, सिंह गर्जना, ओंकार साधना यांच्या नियमित सरावाने घोरण्याची समस्या दूर होते.

No comments:

Post a Comment