स्वयंपाकघरात काही पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी ओव्याचा वापर हमखास केला जातो. आजीबाईच्या बटव्यातही ओव्याचा समावेश करण्यात आला आहे. याचं कारण ओव्याचे औषधी गुणधर्म. विशेषत: पोटदुखी वा पोटाशी संबंधित काही विकारांवर ओवा गुणकारी ठरतो, याची बहुतेकांना माहिती आहे. परंतु या व्यतिरिक्तही प्रकृतीच्या तक्रारींवर ओवा गुणकारी ठरतो. ओव्याच्या या गुणधर्माविषयी..
1 ओवा, काळं मीठ आणि सुंठ एकत्र करून त्याचं चूर्ण तयार करावं. हे चूर्ण घेतल्यास पित्त तसंच उलट्याच्या विकारात त्वरित आराम मिळतो.
2 पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी ठरत असल्याने पोटदुखी, गैसेस, उलट्या होणे, आम्लपित्त आदींमध्ये ओव्याचं सेवन अवश्य करायला हवं.
3 वजन कमी करण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग करता येतो. त्यासाठी ओवा घालून ठेवलेलं पाणी प्यावं. यामुळे शरीराची चयापयच शक्ती वाढण्यास मदत होते. त्याच बरोबर शरीरातील चरबीही कमी होते.
4 सतत गुडघेदुखीचा त्रास असेल तर ओवा गरम करून, एका रूमालात बांधून या पुरचुंडीने गुडघ्यांना शेक द्यावा. आराम पडेल.
5 चेहर्यावर सतत मुरूमे, पुटकुळ्या येत असतील तर ओव्याची पूड दहय़ात मिसळून चेहर्याला लावावी. या उपायाने काही दिवसातच मुरूमे, पुटकुळ्या येण्याच्या त्रासापासून सुटका होते.
सर्दी-पडसे, शरीरामध्ये भरून राहिलेली थंडी, किंवा सतत नाकातून पाणी गळत असल्यासही ओवा घेतल्याने फायदा होतो. ओव्यामध्ये शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर टाकण्यास मदत करणारी, तसेच पोटातील जळजळ रोखणारी तत्वे असतात. तसेच छातीमध्ये जमलेला कफ निघून येण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो. सायनसचा त्रास असणाऱ्या व्यक्तींकरिताही ओवा गुणकारी आहे.
No comments:
Post a Comment